श्री. कुलस्वामिनी विद्यावासिनी देवी मंदिरा शेजारीच पश्चिमेस असलेल्या महादेवाच्या मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी व मंगळवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तगणांची गर्दी व पुजा अर्चना होत असते
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
गावात श्री विठ्ठल रुख्मिणी चे सुंदर मंदिर आहे .दरवषी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज ,
त्रंबकेश्वर यांचा पंढरपूर ते त्रंबकेश्वर परतीचा पायी पालखी सोहळा दरम्यान दिंडीचा मुक्काम
गावात श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात असतो. या दिवशी संपूर्ण गावात पालखी सोहळा मिरवणूक असते.
अंगणवाडी इमारत
करंजगव्हाण येथे गाव व वाडी वस्ती मिळून एकूण-०५ अंगणवाडी आहेत. त्यापैकी ०४ अंगणवाडी ला इमारत सुविधा आहेत.
विंद्यावासिनी नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगव्हाण
करंजगव्हाण येथे इयत्ता ०१ ली ते ०४ थी विध्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. करंजगव्हाण गावातील प्राथमिक शाळेत एकूण ३८ विध्यार्थी शिक्षण घेतात. शाळेसाठी एकूण ०२ वर्ग खोल्या आहेत.
जि.प.प्रार्थमिक शाळा करंजगव्हाण
एकूण १० वर्ग खोल्या आहेत. ज्यात २८४ विध्यार्थी शिक्षण घेतात.