करंजगव्हाण हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक मोठे व विकसित गाव आहे. गावाची एकूण लोकसंख्या ५०२६ असून त्यापैकी पुरुष २६४५ व स्त्रिया २३८१ आहेत. गावाचे एकूण क्षेत्रफळ १५३३.३५ हेक्टर आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून बाजरी, कांदा, भाजीपाला, गहू, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. गावात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बाजारपेठ व बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. करंजगव्हाण गावास तंटामुक्ती पुरस्कार – २०१५ प्राप्त झाला आहे.
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार करंजगव्हाण लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
तपशील
पुरुष
स्त्रिया
एकूण
एकूण लोकसंख्या
२६४५
२३८१
५०२६
🏠 घरांची माहिती
प्रकार
संख्या
पक्की घरे
८९२
कच्ची घरे
३५४
एकूण घरे
१२४६
🌍 क्षेत्रफळ व जमीन वापर
तपशील
क्षेत्र (हे.)
गावाचे एकूण क्षेत्र
१५३३.३५
गावठाण
६.१९
शेतजमीन (एकूण)
१०१३
└ कोरडवाहू
२०२.७
└ बागायती
११४.८४
└ पडीत
३८५.२१
वनजमीन
२४३.१०
🏛 ग्रामपंचायत मालकी व सुविधा
घटक
स्थिती
गायरान
होय
मैदान
होय
आठवडे बाजार
बुधवार
व्यावसायिक गाळे
ग्रामपंचायत व खाजगी
🏢 सरकारी कार्यालये
कार्यालय
तलाठी कार्यालय (चावडी) – करंजगव्हाण
ग्रामपंचायत कार्यालय
बँक
पोस्ट ऑफिस
🏥 आरोग्य सुविधा
सुविधा
तपशील
ग्रामीण रुग्णालय
करंजगव्हाण
उपकेंद्र
उपलब्ध
खाजगी दवाखाने
७
पशुवैद्यकीय दवाखाना
करंजगव्हाण
🎓 शिक्षण व प्रशिक्षण सुविधा
संस्था
संख्या / तपशील
अंगणवाड्या
५
प्राथमिक शाळा
जि.प. शाळा – ३
माध्यमिक शाळा
न्यू इंग्लिश स्कूल & जूनियर कॉलेज (Arts & Science)
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला